विष प्राशन करून शेतमजुराची आत्महत्या

By Admin | Updated: June 30, 2017 00:19 IST2017-06-30T00:19:39+5:302017-06-30T00:19:39+5:30

खामगाव: विष प्राशन करून शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी तालुक्यातील नागापूर येथे घडली.

Farmer suicides by poisoning | विष प्राशन करून शेतमजुराची आत्महत्या

विष प्राशन करून शेतमजुराची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विष प्राशन करून शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी तालुक्यातील नागापूर येथे घडली.
याप्रकरणी नागापूर येथील कैलास लक्ष्मण कवडकार (वय ४२) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्यांच्या रामनगर शिवारातील शेतामध्ये विजयसिंग रामसिंग डाबेराव (वय ५०) रा. नागापूर हा शेतमजूर काम करीत होता. दरम्यान, २९ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या पुर्वी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Farmer suicides by poisoning