खामगाव तालुक्यातील मुरंबा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:21 IST2018-08-31T13:21:16+5:302018-08-31T13:21:32+5:30
खामगाव : कर्ज फेडू शकत नसल्याने विवंचनेत असलेल्या खामगाव तालुक्यातील मुरंबा येथील शेतकऱ्याने ३१ आॅगस्टरोजी जीवनयात्रा संपवली.

खामगाव तालुक्यातील मुरंबा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
खामगाव : कर्ज फेडू शकत नसल्याने विवंचनेत असलेल्या खामगाव तालुक्यातील मुरंबा येथील शेतकऱ्याने ३१ आॅगस्टरोजी जीवनयात्रा संपवली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अर्ज भरूनही अद्याप संबधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकºयावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. गतवर्षी कपाशी, उडीद, मुगाच्या पीकाचे उत्पादन झाले नाही. त्यात मुलामुलींचे शिक्षण, कुटूंबाचा उदरनिर्वाह हा सर्व भार पेलणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. याच विवंचनेत असलेले तालुक्यातील मुरंबा येथील शेतकरी राजेश विठ्ठल जवंजाळ (वय ३७) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभिर असल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे स्टेटबँकेचे कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.