कुटे यांच्या घरावर शेतकरी दिंडी

By Admin | Updated: June 8, 2017 02:34 IST2017-06-08T02:34:36+5:302017-06-08T02:34:36+5:30

शेतकरी महिलांनी दिले निवेदन

Farmer Dindi at Kute's house | कुटे यांच्या घरावर शेतकरी दिंडी

कुटे यांच्या घरावर शेतकरी दिंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी ७ जून रोजी संपूर्ण कर्जमुक्ती तथा स्वामिनाथन आयोग लागू करा, निर्यात बंदी उठवावी, इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी या विभागाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी दिंडी काढली.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासह विविध घोषणा देत जळगाव, संग्रामपूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील मुख्य चौकामधून दिंडी काढली व सदर दिंडी आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर नेली. या दिंडीला भाराकाँ, राकाँ, भारिप-बमसं, भाकप, माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा होता. आमदार कुटे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रमेश बाणाईत, तालुकाध्यक्ष अनंता बकाल, रामेश्वर काळे, ज्ञानदेव तायडे, ज्योती ढोकणे, डॉ.स्वाती वाकेकर, राजेंद्र भोंगळ यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी आ.कुटे यांच्या प्रतिनिधीने दिंडीचे निवेदन स्वीकारले. या शेतकरी दिंडीमध्ये प्रसेनजित पाटील, रंगराव देशमुख, गजानन देशमुख, युनूसखान, प्रवीण भोपळे, अजयसिंह राजपूत, अविनाश उमरकर, बालगजानन अवचार, संदीप उगले, राजेंद्र देशमुख, बंडू पाटील, बाळू डिवरे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: Farmer Dindi at Kute's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.