अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:51 IST2018-10-29T17:51:39+5:302018-10-29T17:51:48+5:30
खामगाव : शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर अस्वलाने हल्ला चढविला.

अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू
खामगाव : शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर अस्वलाने हल्ला चढविला. यात शेतमजूर ठार झाल्याची घटना तालुक्यातील वझर गाव शिवारात सोमवारी सकाळी घडली.
बुलढाणा जिल्ह्यात प्राण्यांचे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोमवारी खामगाव तालुक्यातील वझर गाव शिवारामध्ये सकाळी गवत कापण्यासाठी मनोहर बबन वाकोड़े ( वय 48) या शेतमजूरावर अस्वलाने हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये वाकोडे हे गंभीर रित्या जखमी झाले. जखमी अवस्थेतच दोन तास शिवारातच पडून राहिल्याने त्यांना रक्तस्राव खुप झाला. नंतर बकऱ्याचा आणण्यासाठी गेलेल्या मेंढपाळांना ते दिसून आले. त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.