गरिबीला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST2021-05-07T04:36:56+5:302021-05-07T04:36:56+5:30
वर्दडी येथील अल्पभूधारक शेतकरी बबन पुंजाराम शिंदे यांच्याकडे वीस गुंठे क्षेत्र जमीन आहे. यामध्ये उत्पादन हाेत नव्हते. त्यांच्या वडिलांना ...

गरिबीला कंटाळून शेतमजुराची आत्महत्या
वर्दडी येथील अल्पभूधारक शेतकरी बबन पुंजाराम शिंदे यांच्याकडे वीस गुंठे क्षेत्र जमीन आहे. यामध्ये उत्पादन हाेत नव्हते. त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांच्या रुग्णालयाचा खर्च व कुटुंबाचा गाडा हाकताना बबन शिंदे हे कसरत करत हाेते. त्यातच गत १५ दिवसांपासून संचारबंदीमुळे मजुरीही नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले हाेते. कुटुंबाचा गाडा पुढे कसा चालवायचा, या विवंचनेत त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ५ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शेतातून नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला गेले असता सायंकाळी आठ वाजेपर्यंत ते परत आले नाहीत. त्यानंतर त्यांच्या मुलांनी व परिवारातील लोकांनी शोध घेतला असता, ते शेतात मृतावस्थेत आढळून आले हाेते. याप्रकरणी किनगाव राजा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.