शेतक-यांनी केला पेरणी यंत्रात बदल

By Admin | Updated: June 22, 2016 23:53 IST2016-06-22T23:53:27+5:302016-06-22T23:53:27+5:30

कृषी विभागाचा उपक्रमार्तंगत बियाण्यांची बचत करून उत्पादनात वाढ करण्याचा शेतक-यांनी संकल्प केला आहे.

The farmer changed the sowing machinery | शेतक-यांनी केला पेरणी यंत्रात बदल

शेतक-यांनी केला पेरणी यंत्रात बदल

लोणार (जि. बुलडाणा): दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यानंतरही उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता शेतकर्‍यांनी यंदा आपल्या पेरणी यंत्रात बदल केल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळेच बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास २0 टक्के बियाण्य़ांची बचत होऊन १५ ते २0 टक्क्यांपर्यंंत उत्पादनात वाढ होणार असल्याचा संकल्प तालुका कृषी विभागाने घेतला आहे. पारंपरिक पेरणी पद्धतीला कलाटणी देत, नवीन संकल्पानुसार तालुका कृषी अधिकारी जी.एल.तरटे, मंडळ कृषी अधिकारी सतीश दांडगे, जितेंद्र सानप यांनी जांबूल येथील शेतकरी राजू पडोळ यांच्या शेतात बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने सुरू असलेल्या पेरणीची पाहणी केली. दोन दिवसात झालेल्या पेरणीयुक्त पावसामुळे तालुक्यात पेरण्यांनी जोर धरला असून, कृषी विभागाकडून गतवर्षी १३ तर यंदा २७ शेतकर्‍यांना ८५ टक्के अनुदानावर बीबीएफ पेरणी यंत्राचे वाटप करण्यात आले. बाजारात या पेरणी यंत्राची किंमत ४८ हजार रुपये असून, कृषी विभागाकडून अल्प भूधारक शेतकर्‍यांना ४ हजार ३४८. तर बहुभूधारक शेतकर्‍यांना १३ हजार रुपये शेतकरी हिस्सा घेऊन बीबीएफ यंत्राचे वितरण केले आहे. दोन दिवसात झालेल्या ७५ मिमी पावसानंतर सोयाबीन पेरणी रुंदसरी वरंबा पद्धतीने करता येत असल्याने बियाण्यांची बचत होते. अतवृष्टी झाल्यानंतर जास्तीचे पाणी सरींमधून वाहून जाते. तर कमी प्रमाणात पाऊस झाल्यास पावसाचे पाणी जमिनीत जिरते. यामुळे पेरणीनंतर १0 ते १५ दिवस पावसाचा खंड पडला तरीही पीक तग धरुन राहते.

Web Title: The farmer changed the sowing machinery