शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

घराघरात तापाचे रुग्ण

By admin | Updated: October 9, 2014 00:35 IST

लोणार तालुक्यात अज्ञात तापाची साथ; मेहकर तालुक्यातील युवकांचा अज्ञात तापाने मृत्यू.

कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : कोयाळी दहातोंडे व उदनापूर येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. येथील प्रत्येक घराघरात अज्ञात तापाने रुग्ण फणफणत असून, आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे परिसरात वाढती अस्वच्छता, मच्छरांचा उच्छाद व बदलते वातावरण अशा विविध कारणांमुळे साथीच्या आजाराने डोकेवर काढण्यास सुरूवात केली आहे. पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. सध्या कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे घराघरात अज्ञात तापाचे रुग्ण आहेत. उद्नापूर येथील ऋषिकेश मुळे या ६ वर्षाच्या बालकाचा तापाने मृत्यू झाला असूनसुद्धा आरोग्य विभागाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. * युवकाचा मृत्यू हिवराआश्रम (मेहकर, जि. बुलडाणा): अज्ञात तापाने येथील एका २४ वर्षीय युवकाचा उ पचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. येथील आशीष गौतम जाधव (२४) हा विवेकानंद कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत होता. त्याला ताप आल्याने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याने पुढील उ पचारार्थ त्याला अकोला येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान आशीषचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीसुद्धा आशीषच्या भावाचा रॅबिजमुळे मृत्यू झाला होता. गौतम जाधव यांना २ मुली व २ मुले असा परिवार होता.