आराेग्य कर्मचाऱ्यांना सुविधा द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:52+5:302021-03-23T04:36:52+5:30
वेतन महिन्याच्या एक तारखेस देण्यात यावे, कोविड केअर सेंटरकरिता संपूर्ण स्टाफ ए.एन.एम.सहित नव्याने भरण्यात यावा, प्रा. आ. केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ...

आराेग्य कर्मचाऱ्यांना सुविधा द्या!
वेतन महिन्याच्या एक तारखेस देण्यात यावे, कोविड केअर सेंटरकरिता संपूर्ण स्टाफ ए.एन.एम.सहित नव्याने भरण्यात यावा, प्रा. आ. केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात येऊ नयेत, प्रत्येक प्रा. आ. केंद्राच्या ठिकाणी एन.एच.एम अंतर्गत स्टाफ नर्स तत्काळ भरण्यात याव्यात, लसीकरणाकरिता ज्या ठिकाणी ए.एन.एम.ची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी सत्राप्रमाणे रोजंदारीवर ए.एन.एम.ची नेमणूक करण्यात यावी. कोविड लसीकरण बुथवर ड्रायरनमध्ये करून घेतलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण जिल्हाभरात आयडी कार्ड व्हेरिफिकेशन इन कोविड अप्लिकेशन, व्हॅक्सिनेशन, पोस्ट व्हॅक्सिन ऑब्झर्व्हेशन, बुथ मॅनेजमेंट याकरिता पाच पाच लोकांची इतर विभागांसह ड्युटी लावण्यात यावी, आदींसह इतर मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर एन.एल.धायडे, व्ही.बी. डोंगरे, एस.वाय. पराड, व्ही.टी. वायाळ, जी.बी.पाखरे, जे.एस.तडवी, डी.व्ही. इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.