नेत्र पेढ्यांमधील नेत्र संकलन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:11 IST2017-06-07T00:11:38+5:302017-06-07T00:11:38+5:30
वैद्यकीय नियमांची पुर्तता केली नाही: शेकडो नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प

नेत्र पेढ्यांमधील नेत्र संकलन बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात नेत्रदानाचा संकल्प करणारी व नेत्रदान करणाऱ्या दात्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्ह्यात असलेल्या बुलडाणा व खामगाव येथील दोन शासकीय नेत्रपेढीतील नेत्र संकलनाचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. वैद्यकिय नियमांची पुर्तता न केल्यामुळे नेत्रपेढीचे बुलडाण्यातील दोन नेत्रपेढीतील नेत्रसंकलन कार्य सध्या बंद आहे.
जिल्ह्यातील दरवर्षी हजारो नागरिक नेत्रदानाचा संकल्पक करतांना, शिवाय मरणोत्तर नेत्रदान केल्याच्या उदाहरणही बरीच आहे. नेत्रदान करुन ईच्छीणाऱ्यांसाठी बऱ्याच वेळा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व इतर रुग्णालयाकडे नेत्रदान संकल्प पत्र नसल्यामुळे अशा नागरिकांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जाते. शिवाय नेत्रदान शस्त्रक्रिया करण्यासाठी ही बुलडाणा येथील वैद्यकिय पथकालाच पाचारण करण्यात येते. मात्र नेत्रसंकलनाची सुविधा नसल्यामुळे मोजक्या खाजगी रुग्णालयात नेत्रदानासाठी शस्त्रक्रिया केली जाते.
जिल्ह्यात बुलडाणा येथील नेत्र पेढी सुरु असून येथील नेत्रसंकलन सद्या बंद आहे. तर खामगाव येथील नेत्रपेढी पुर्णता: बंद आहे. खामगाव येथून नागपूला नेत्र संकलानासाठी पाठविण्यात येत होते. मात्र हे अंतर सुमारे ३०० किलोमीटरचे असल्याने डोळे पाठविताना प्रचंड काळजी घ्यावी लागत होती. शिवाय वैद्यकिय सेवा व अटींची पुर्तता न केल्यामुळे जिल्ह्यातील नेत्रसंकलनाचे काम बंद करण्यात आले.
आयबॉलची बसमधून होते वाहतूक
बुलडाणा जिल्ह्यात नेत्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या नेत्रबुब्बुळ (आयबॉल) जालना नेत्रपेढीला पाठविण्यासाठी आरोग्य विभागाकडे स्वतंत्र्य व्यवस्था नसल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसचे सहकार्य घेतले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयबॉल अॅन्टी बायोटिक्स औषधीसह बर्फाच्या पेटीत बंद बस चालकाकडे दिले जाते.बस जालन्या पोहचल्यानंतर पेढीतील कर्मचारी बसचालकाडून सदर नेत्र बुब्बुळ संकलित केले जाते.