शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:01 IST

नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या; जून महिन्यात १०० मीमीदेखील पाऊस नाही

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यात यंदा मान्सून नेमक्या वेळेत दाखल झाला असून, कोकण, पुणे आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात १०० मिमीदेखील पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

विदर्भ व मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांचे पेरणी मोठे क्षेत्र आहे. मात्र, जून अखेरीस अपेक्षित पाऊस न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरून ठेवल्याने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता दर्शवली आहे.

मान्सून दिल्लीच्या दारी; दिवसभरासाठी येलो अलर्ट

मोसमी पाऊस अर्थात मान्सून दिल्लीपर्यंत पोहोचला असून, मंगळवारी (दि. २४) पाऊस राजधानी क्षेत्रात दाखल होऊ शकतो. दरम्यान, दिल्ली क्षेत्रात दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीतील बहुतांश भागांत मान्सूनच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल आहे. 

'स्कायमेट' या खासगी हवामानविषयक संस्थेनेही मंगळवारी दिल्लीत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोजक्या भागांत पाऊस झाला, तर राजस्थानमध्ये जयपूरसह काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतवगळता अन्य भागांत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.

'विदर्भाकडे सरकारने लक्ष द्यावे'

विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीही केल्या. आता मात्र विदर्भात दुष्काळसदृश स्थिती आहे. कापसाचे बियाणे पेरल्यावर त्याला अंकुर आले आणि ते फस्त करण्याचे काम 'वाणी' नावाची कीड करत आहे.

 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे गट नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आले आहे. ३५ टक्के पेक्षा सोयाबीनचा पेरा झाला नाही. तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ