शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

दीड लाख कर्जमाफीनंतरही शेतकर्‍याला अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:15 AM

रुईखेड मायंबा :  शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये एप्रिल २00९ ते  ३0 जून २0१६ पर्यंतचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले असले तरी एका शेतकर्‍याकडून निर्धारित तारखेनंतर मूळ रकमेवर व्याज आकारण्यात आल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकर्‍याला अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे.

ठळक मुद्देचांडोळ परिसरात समोर आला प्रकार

बबन फेपाळे । लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा :  शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये एप्रिल २00९ ते  ३0 जून २0१६ पर्यंतचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले असले तरी एका शेतकर्‍याकडून निर्धारित तारखेनंतर मूळ रकमेवर व्याज आकारण्यात आल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकर्‍याला अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे.जिल्ह्यातील दोन लाख २२ हजार ३0९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, अनेकांना लाभ मिळाला.   कर्ज माफी जाहीर केली तेव्हापासून शेतकर्‍यांचे शासनाने ठरवून दिलेल्या निकषापर्यंतचे सर्वच कर्ज खाते नील करावयास हवे होते; परंतु काही बँकांनी ३१ जुलैनंतरचे व्याज मूळ रकमेवर वसूल करणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना भुर्दंड बसत आहे.  रुईखेड मायंबा येथील अमोल नारायण उगले या शेतकर्‍याने चांडोळ येथील महाराष्ट्र बँकेकडून २८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतकरी कर्जमाफीनंतर उगले चांडोळ येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत कर्ज खात्याचे नीलचे प्रमाणपत्र आणण्यासाठी गेले असता, त्यांना   कर्जाच्या मूळ रकमेवरील एक हजार ५७५ रुपयांचे व्याज अगोदर भरण्यास सांगण्यात आले. ते भरल्यानंतर त्यांना  नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

८४ महिन्यांचे कर्ज, त्यावरील व्याज माफशेतकरी कर्जमाफीसंदर्भात एप्रिल २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आलेले असून, जुलै २0१७ पर्यंतचे व्याज माफ केले गेले आहे. त्यातच उर्वरित पुढील पाच महिन्यांचे व्याज शेतकर्‍यांना आकारू नये, अशा सूचना राज्य शासनाने बँकांना तोंडी स्वरुपात दिल्या आहेत; मात्र काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून असा प्रकार सुरू आहे. बँकांनी असे व्याज आकारू नये, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. लिखीत स्वरुपात अशा सूचना  केल्या गेल्या नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांकडून व्याजाच्या रूपाने होणारी आर्थिक पिळवणूक थांबवून शासनाने बॅकांना व्याज न घेण्याचे आदेश द्यावे.- अमोल नारायण उगले, शेतकरी, रुईखेड (मायंबा)

कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांकडून जुलै २0१७ नंतरचे व्याज बँक आकारत नाही. बँकेमध्ये सहा हजार खाते आहेत. डाटा पंचींगमध्ये अडचण आल्याने असे झाले असले. त्यातच कर्जमाफीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतर १५ सप्टेंबरला बँकेला ६६ कॉलममधील अर्ज मिळाले होते. त्यामुळे डाटा मल्टीपल ठिकाणी पेस्ट झाल्याने ही त्रुटी राहिली असावी. या व्यतिरिक्त कर्ज मंजूर करतानाची प्रोसेसिंग फी, पीकविम्याचा प्रीमियम प्रसंगी घेतल्या जातो. शासनाकडून बँकेला प्रोसेसिंग फीसंदर्भात रक्कम दिली जात नाही. कर्ज व कर्जावरील व्याज दिल्या जाते. - चंद्रशेखर पाठराबे, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, चांडोळ.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी