केसापूर येथे रानभाज्या पोषण आहार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:10+5:302021-09-26T04:37:10+5:30

गरोदर माता, स्तनदा माता यांना पोषण आहार संबंधित मार्गदर्शन करण्यात आले़ यावेळी परसबाग आहार प्रदर्शनीचे उद्घाटन रायपूर जिल्हा ...

Exhibition of Vegetable Nutrition Diet at Kesapur | केसापूर येथे रानभाज्या पोषण आहार प्रदर्शन

केसापूर येथे रानभाज्या पोषण आहार प्रदर्शन

गरोदर माता, स्तनदा माता यांना पोषण आहार संबंधित मार्गदर्शन करण्यात आले़ यावेळी परसबाग आहार प्रदर्शनीचे उद्घाटन रायपूर जिल्हा परिषद सदस्य साधनाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. रान भाज्यापासून अंबड याच्या भाजीच्या पुऱ्या,पोथीच्या पानाच्या वड्या, दुधी भोपळापासून वडा उडदाच्या डाळीचे वडे पराठे, ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी सर्व प्रकारचे भाज्या फळे दूध अंडी सर्व प्रकारच्या चटण्या सार पदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले़

यावेळी जिल्हा परिषद सदस्य साधना जाधव, पंचायत समिती सभापती उषाताई ताठे, उपसभापती कविता लहासे, रायपूर पंचायत समिती सदस्य चांद मुजावर माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीप जाधव, बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, बुलडाणा कार्यक्रम अधिकारी अरविंद रामरामे, लस नियंत्रक दीपक महाले, रायपूर व अधिक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर तायडे, प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, केसापूर सरपंच किरण बिल्लारी, उपसरपंच वंदना निकम, रायपूर विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिकानंदा शेळके, आशा गटप्रवर्तक वैशाली ठाकरे विभागातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका या प्रदर्शनीला उपस्थित होत्या़

Web Title: Exhibition of Vegetable Nutrition Diet at Kesapur