शेगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:44 IST2019-11-23T12:44:09+5:302019-11-23T12:44:26+5:30

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

Excitement of BJP workers in Shegaon | शेगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

शेगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

 शेगाव- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला नगराध्यक्ष सौ शकुंतलाबाई बुच,भाजपा शहराध्यक्ष डाॅ मोहन बनाले, डाॅ अंजुषा भुतडा, सौ ज्योती चांडक, मोहन हुसे यांचे हस्ते हारार्पण केला. फटाक्यांचा आतिशबाजी करत ढोल तलावाच्या तालावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेका धरला.यावेळी भाजपा न प गटनेते शरदसेठ अग्रवाल, विजयबाप्पू देशमुख, पी एम शेगोकार,  पांडुरंग बुच, कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, संतोषबापू देशमुख, गजानन जवंजाळ, नितीन शेगोकार,राजु अग्रवाल, प्रदिप सांगळे,संजय कलोरे, डाॅ राजेश सराफ, मनोज काशेलानी, अरविंद इंगळे, अमित जाधव, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Excitement of BJP workers in Shegaon