शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

संकटकाळी समाजाला मदत करणे प्रत्येकाचंच कर्तव्य -- बिपीन गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:02 IST

लोकवर्गणीतून  राज्यातील पहिली टेस्टिंग लॅब उभी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शिक्षणामुळे स्वत:ची उन्नती  होते. तर आरोग्यामुळे स्वत: आणि समाज या दोहोंचीही उन्नती होते. मनुष्य जीवनात तन पवित्र करण्यासाठी सेवा महत्वाची असून दानामुळं मनुष्याच्या जीवनातील गर्वाच हरण होते. हा आपला प्रामाणिक समज आहे. त्यामुळेच  कोरोना संकट काळात खामगावकरांसाठी लोकवर्गणीतून  राज्यातील पहिली टेस्टिंग लॅब उभी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांच्याशी साधलेला संवाद...

       कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी कुणाचे सहकार्य लाभले?सामाजिक दायित्व म्हणून कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होताना अमरावती येथील स्वप्नील गावंडे याचं मोलाचे सहकार्य लाभले. लोकवर्गणीतून कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करताना शहरातील काही सामाजिक संस्थांशीही संपर्क साधला. स्थानिक आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी त्यांच्या निधीतून २० लक्ष रुपयांचा निधी दिला. डॉ. गोपाल सोनी यांनी तंत्रज्ञांसह मानसेवी सेवा देण्यास सहकार्य केले. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने इमारत उपलब्ध करून दिली.

कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करताना मार्गदर्शन कोठून घेतले?लोकवर्गणीतून टेस्टिंग लॅब सुरू करताना सुरूवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक अडचण आल्याने खामगावातील कोरोना टेस्टिंग लॅबचे काम रखडले होते. आता खामगावात दोन टेस्टिंग लॅब कार्यान्वित झाल्या आहेत. तथापि, अगदी सुरूवातीला स्वप्नील गावंडे, आॅल इंडिया मेडीकल सायन्स, द इंडियन कॉन्सील आॅफ मेडीकल रिसर्च आणि आरोग्य संचालकांचे मार्गदर्शन मोलाचं ठरलं.

या उपक्रमामागील प्रेरणा कुणाची?सामाजिक कार्याची पहिली प्रेरणा  आई सुशीला गांधी यांची आहे. त्यानंतर उद्योजक रतन टाटा आणि पळसखेड येथील अनाथ आणि मनोरूग्णासाठी नंदू पालवे यांनी सुरू केलेल्या प्रकल्पामुळे समाजासाठी वेगळं काही तरी करण्याची जागृती निर्माण झाली. कोरोना काळात जीवंत आहात हेच फार मोठं पुण्य आहे. व्यावसायिकानं पैसा बघायचा नसतो. ही भावना नजरेसमोर ठेऊन पारिवारिक निधी समाज कल्याणासाठी वापरला. दान हे या हाताचं त्या हाताला कळायला नको. मात्र, समाजातील सृजनशील व्यक्तींनीमुळेच आपण दान केल्याचे समाजासमोर आलं.

 कोविड-१९ टेस्ट मशीन उपलब्ध करण्याची कल्पना सुचली?कोरोना या विषाणूने जगभर हाहाकार माजविल्यानंतर खामगावातही त्याची झळ पोहोचली. आपल्या उद्योगातील एका कर्मचाºयाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्याच्या संपूर्ण परिवाराला रूग्णालयात क्वारंटीन करण्यात आले. खामगावात टेस्टिंग लॅब नसल्यामुळे अहवाल यायला उशीर लागायचा. कर्मचाºयाचे संपूर्ण कुटुंब वेठीस धरल्याचे पाहून खामगावात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा निर्धार केला. त्यानंतर लोकवर्गणीतून राज्यातील पहिलीच कोरोना टेस्टिंग लॅब खामगावात कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीला काही अडथळे आले, मात्र, आता या लॅबचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत