डाेणगावात प्रत्येक दुकानदाराची हाेणार काेराेना चाचणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST2021-03-29T04:20:34+5:302021-03-29T04:20:34+5:30

मेहकर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने ...

Every shopkeeper in Daengaon will have a car test - A | डाेणगावात प्रत्येक दुकानदाराची हाेणार काेराेना चाचणी - A

डाेणगावात प्रत्येक दुकानदाराची हाेणार काेराेना चाचणी - A

मेहकर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने येथील कोरोना तपासणीचा वेग मंदावला होता. डोणगावमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही बाब पाहता आरोग्य विभागाने २३ मार्चपासून कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. वायटी चौक परिसरातील कोरोना चाचणी श्रीराम मठात घेण्यात आली. यात रॅपिडच्या ५२ चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर २४ मार्च रोजी त्रिगोनी चौक परिसर, २५ मार्च रोजी आरेगाव चौक परिसर, २६ मार्च रोजी माळी वेटाळ परिसर, २७ मार्च रोजी इंदिरानगर परिसर, २९ मार्च रोजी राहेमत नगर परिसर अशाप्रकारे संपूर्ण गावातील ग्रामस्थ व सुपरस्पेडर म्हणून गणले जाणारे दुकानदार व त्याच्या दुकानातील मजुरांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

---- कोट--

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दुकानदारांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाचलवाढत गेला तर कोरोना चाचणी अहवाल पाहिल्याशिवाय दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत. तेव्हा प्रत्येक दुकानदाराने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. - डॉ. महेंद्र सरपाते, तालुका वैद्यकीय अधिकारी, मेहकर

Web Title: Every shopkeeper in Daengaon will have a car test - A