अखेर ते फलके झाकले

By Admin | Updated: September 19, 2014 23:09 IST2014-09-19T23:09:16+5:302014-09-19T23:09:16+5:30

शेगावातील अचारसंहिता उल्लंघन, लोकमतमधील वृत्ताने प्रशासनाच जाग.

Eventually they covered the bedspace | अखेर ते फलके झाकले

अखेर ते फलके झाकले

शेगाव: विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता असतांना शेगाव शहरात आचारसंहीतेचा भंग करणारी उदघाटन व शुभेच्छा फलके विविध नेत्यांच्या कामाचा गवगवा करीत उघडीच होती. याबाबत ह्यलोकमतह्णने या वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली आणि शासकीय कार्यालय असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि तहसिल कार्यालयातील उद्घाटन, शुभारंभ व शासकीय योजनांची माहीती देणारे फलके झाकण्यात आली आहेत.
मात्र सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय व सार्वजनिक बांधकाव विभागाच्या उड्डाण पुलाचा उद्घाटन फ लक आजही आचारसंहीतेचा भंग करीत असल्याचे दिसुन येत आहे. तहसिलदार डॉ. रामेर्श्‍वर पुरी यांनी आघाडी सरकारच्या योजनांची माहीती देणारे फलक तात्काळ जमा केले. तर विश्राम गृहाच्या शुभारंभ फलक येथील खानसामांनी वृत्तपत्र चिकटवून झाकुन घेतले. मात्र झोपेत असलेले सईबाई मोटे उपजिल्हा प्रशासन आणि शेगाव विकास आराखड्या अंतर्गत सुरु असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे सा.बां. विभागाच्या हद्दीतील फलक आजही आचार संहीतेचा भंग करीत असल्याचे दिसुन येते.

Web Title: Eventually they covered the bedspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.