चिखली येथे इको फ्रेन्डली गणेशाची स्थापना

By Admin | Updated: September 2, 2014 01:06 IST2014-08-31T23:27:38+5:302014-09-02T01:06:01+5:30

चिखली येथे फांद्या व दोरीच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या ‘इको फ्रेन्डली’ गणेशाची स्थापना.

Establishment of Eco Friendly Ganesha at Chikhali | चिखली येथे इको फ्रेन्डली गणेशाची स्थापना

चिखली येथे इको फ्रेन्डली गणेशाची स्थापना

चिखली : येथील सहकार्य गणेश मंडळाच्यावतीने यावर्षी केवळ नारळाच्या झाडाच्या फांद्या व दोरीच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या ह्यइको फ्रेन्डलीह्ण गणेशाची स्थापना करण्यात येवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
इंजिनिअर व फार्मासिस्ट असलेल्या सुमारे ७५ युवकांचा ग्रृप असलेला सहकार्य फाऊंडेशनमधील युवकांनी यावर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुढाकार घेवून केवळ नाराळाच्या झाडाच्या फांद्या व दोरीच्या सहाय्याने पाच फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना डि.पी.रोडवर केली आहे. सहकार्य गणेश मंडळाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ही गणेश मूर्ती स्थानिक पुंडलिकनगर मधील बी.कॉमचे शिक्षण घेणार्‍या पंकज जगदीश भारव्दाज याने साकारली असून ही मूर्ती बनविण्यासाठी ३ हजार रूपयांचा खर्च आला आहे. याशिवाय गणेश मूर्तीच्या सजावटीसाठीही सर्व नैसिर्गीक साहित्यांचा वापर करण्यात आला असून विशेष म्हणजे याठिकाणी साऊंड सिस्टीमही न लावता ध्वनी प्रदूषण टाळण्याची दक्षताही मंडळाने घेतली आहे.

Web Title: Establishment of Eco Friendly Ganesha at Chikhali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.