जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:26 PM2019-06-26T17:26:33+5:302019-06-26T17:27:30+5:30

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर,जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा,

At the end of June 307 tankers in the district | जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

जून अखेरही जिल्ह्यात ३०७ टँकर

Next
href='http://www.lokmat.com/topics/buldhana/'>बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस पडला असला तरी अद्याप पाणीटंचाई निकाली निघण्याच्या दृष्टीने दमदार असा पाऊस झाला नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. परिणामी जून अखेरही जिल्ह्यात तबब्ल ३०७ टँकरद्वारे २८४ गावांना पाणीपुरवठा होत असून ६७६ गावांमधील ९४३ विहीरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेल्या आहे.खरीप हंगामाला यंदा सुरूवात झाल्यानंतरही अपेक्षीत पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. जून महिन्याचीच पावसाची तुट ही ६३ टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा दमदार असा पाऊस पडत नाही तोवर पाणीटंचाईचा ससेमिरा काही सुटणार नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका वगळता अन्य सर्व १२ तालुक्यात अद्यापही टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही तीन टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे मधल्या काळात पडलेल्या सरासरी ५२ मिमी पावसामुळेही प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षीत वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न पडल्यास जुलै महिन्यातील स्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात अपेक्षीत असणारा सरासरी १४१.६ मिमी पाऊसही जिल्ह्यात पडलेला नाही. वर्तमान स्थितीत केवळ ५२.७ सरासरी पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी ही ३७.१९ टक्के आहे. अर्थात जून महिन्यात ६३ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात आहे. त्यामुळे येत्या काळात जर दमदार पाऊस जिल्ह्यात पडला नाही तर टँकरग्रस्त गावांसोबतच ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांनाही पाण्याच्या उपलब्धतेची समस्या भेडसाऊ शकते. त्यामुळे जून महिन्यात पावसाने एक प्रकारे जिल्ह्याला चकवल्या सारखेच आहे.जिल्ह्यात एक हजार १९५ पाणी पुरवठा योजना आहे. जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा सारख्या काही योजना वगळता अन्यत्र दमदार पाऊस न पडल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक गडद बनू शकते असा कयास आहे. दरम्यान, २३ आणि २४ जून रोजी पडलेल्या पावसामुळे टँकरच्या स्थितीत काही बदल झाला काय? याची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली. तालुका निहाय टँकरची संख्याबुलडाणा ४६, चिखली २७, देऊळगाव राजा २९, मेहकर ३०, लोणार १३, सिंदखेड राजा ३०, खामगाव ४३, शेगाव २७, संग्रामपूर १, मलकापूर ८, मोताळा २५, नांदुरा २१ या प्रमाणे तालुकानिहाय टँकरची संख्या आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात टँकरने त्रिशतक पार केले आहे. २८४ गावांना सध्या ३०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ९४३ विहिरी अधिग्रहीतटंचाईची दाहकता अद्यापही ग्रामीण भागात असून ६७६ गावांतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी ९४३ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. दरम्यान, अधिग्रहीत करण्यात आलेल्या काही विहीरींना पाणीच उपलब्ध नसल्याने काही पर्यायी विहीरी प्रशासनास अधिग्रहीत कराव्या लागल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.

Web Title: At the end of June 307 tankers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.