कर्मचार्यांचे धरणे
By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-01T23:18:05+5:302014-07-02T00:36:48+5:30
मलकापूर पंचायत समिती सदस्याकडून कर्मचार्यांना शिवीगाळ

कर्मचार्यांचे धरणे
मलकापूर : येथील पंचायत समिती सदस्याने पंचायत समिती कर्मचारी तथा गोडावून किपरला गोडावूनमधून विद्युत पंप आताचे आता काढून देण्याचे सांगताच धनादेशाअभावी नकार दिल्याने कर्मचार्याला पंचायत समिती सदस्य विनोद क्षीरसागर यांनी अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी भ्रमणध्वनीवरून दिली. त्यामुळे आज १ जुल ै रोजी ह्यत्याह्ण पंचायत समिती सदस्याविरूध्द पंचायत समिती कर्मचार्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तर या आंदोलनात पाठिंबा म्हणून ग्रामसेवक युनियनही सुध्दा सहभागी झाली होती.
पंचायत समिती सदस्य विनोद क्षीरसागर यांनी काल संध्या. ६.३0 वा. गोडावून किपर अनिल खर्चे यांना भ्रमणध्वनीवरून आताचे आता कार्यालयात येवून तात्काळ विद्युत पंप काढून देणेकरीता सांगितले. परंतु कागदपत्र व धनादेशअभावी नकार दिल्यामुळे क्षीरसागर यांनी अनिल खर्चे यांना व कृषी विभागातील सर्व कर्मचार्यांना आई बहिणीवरून अश्लिल शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पंचायत समिती कर्मचारी रिंढे, खंडारे, परिचारक निंबाळकर, झनके यांना दूरध्वनीवरून मी पंचायत समिती आवारात अंगावर रॉकेल घेवून आत्महत्या करतो व सर्व अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांचे नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो, अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आज पंचायत समितीच्या जी.पी. पाटील, निकम, गाढवे, जाधव, राठोड, राजपूत, कांदेले, अढाव, परळकर, ठोंबरे, खर्चे, देवरे, झनके, खांदे, देशमुख, सोळंके, रायपुरे, संबारे, सरकटे, शेगोकार, खोडके, गवई, वाणी, नारखेडे, तायडे, जोशीसह जवळपास ५0 कर्मचार्यांनी काम बंद करून धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष डि.डी. वराडे, सचिव एस.एल. वराडे आंदोलनात सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.