खामगाव शहरात १४ लाखांची वीज चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:16 IST2019-12-18T15:16:09+5:302019-12-18T15:16:26+5:30
मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली.

खामगाव शहरात १४ लाखांची वीज चोरी उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर व शहराअंतर्गत येणाऱ्या छोट्या छोट्या गावांमध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढत असून येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मागील आठ महिन्यात ३० वीज चोºया पकडून १४ लाख ३१ हजाराची वीज चोरी उघड करण्यात आली आहे, अशी माहिती येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांनी दिली.
वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अलीकडेच बहूतांश ग्राहकांकडून वीज बील कमी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून वीज चोरी केल्या जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे वीज चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. मीटरमध्ये छेडखानी करणे, आकोडे टाकुन वीज चोरी करणे, यासह विविध प्रकारे वीज चोरी केल्या जात आहे. येथील महावितरणकडून मागील एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये एकुण ३० वीज चोरांना पकडण्यात आले आहे. उपरोक्त वीज चोरांनी सुमारे पावणे दोन लाख वीज युनिटची चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यांना महावितरणकडून १४ लाख ३१ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी २३ वीज चोरांनी १३ लाख ६३ हजाराचा दंड भरला आहे. तर उर्वरीत ७ वीज चोरांवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. शहरातील सिव्हील लाईन, नांदुरा रोड, शंकर नगर, चांदमारी, बाळापुर फैल, बर्डे प्लॉट, फरशी, दाळफैल, शिवाजीनगर, गोपाळ नगर आदी भागात ही वीज चोरी पकडण्यात आली आहे. यामध्ये कॉटन मार्केट फिडरमध्ये १० चोºया, अर्बन-३ मध्ये ११ चोºया, फरशी फिडरमध्ये ४ चोºया पकडण्यात आल्या आहेत.
(वार्ताहर)