ट्रकची बसला धडक, वृद्ध महिला ठार, २६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 18:04 IST2021-08-23T18:03:55+5:302021-08-23T18:04:01+5:30
Elderly woman killed, 26 injured in truck collision : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार तर २६ प्रवाशी जखमी झाले़.

ट्रकची बसला धडक, वृद्ध महिला ठार, २६ जखमी
देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार तर २६ प्रवाशी जखमी झाले़. यापैकी ९ जण गंभीर असल्याने त्यांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे़. ही घटना २३ ऑगस्ट राेजी दुपारी घडली़.
परिवहन मंडळाची बस औरंगाबाद वरून यवतमाळकडे साेमवारी दुपारी देऊळगाव राजा मार्गे जात होती़. जालना बायपासवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहु ट्रक क्र. एम.एच.१८ बी एच १९१९ने बसला धडक दिली़. यामध्ये बसमधील महिला गयाबाई खंडारे(वय ६५) या जागेवरच ठार झाल्या़. तसेच २६ जण जखमी झाले़. त्यापैकी ९ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़. गंभीर जखमीमध्ये कोमल सोनवणे (शिराळा, वय ३०), दिगंबर दत्ता वाळे, गारखेडा ,सुशीला पवार, विकास आरसा रिसोड , श्याम सुरेश गोफणे ,औरंगाबाद , रजीहा मुन्नीवाले कारंजा लाड व ,मारुती धनाजी हरकळ जालना ,मुसा बाबू मुन्नी वाले कारंजा लाड , संगीता मारोती हरकळ, आंबा तालुका परतुर, या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले़. बस चालक मोहसीन करीम शेख यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पाेलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहे़.