शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातून आठ जणांना विषबाधा!

By admin | Updated: May 6, 2017 02:39 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना

मलकापूर (जि. बुलडाणा): येथील सायकलपुरा भागातील वृद्धासह सात चिमुकल्यांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बाधीत रूग्ण एकाच कुटुंबातील असून अंगणवाडीतून आणलेली खिचडी खाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यामन, सर्व जणांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अब्दुल सत्तार अ. कादर (७५) यांच्या कुटुंबातील सालीया फिरदोस अ.गफ्फार (१0), इम्रान हुसेन इरशाद हुसेन ( ६), अ.इमरान हुसेन (१२), अलकीया फिरदोस ( १0), नाझीया फिरदोस (१५), अब्दुल इमरान अब्दुल जब्बार (६), अ.सिद्दीक अ.जब्बार (४) अशा सात चिमुकल्यांनी पालीका अखत्यारीतील देशमुख हवेली सायकलपुरा येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंगणवाडीतील खिचडी घरी आणली. तीच खिचडी वृद्ध अ.सत्तार यांनी सेवन केली. सुमारे एक तासानंतर वृद्धासह सातही चिमुकल्यांना ओकार्‍या सुरू झाल्या. त्यामुळे परिवारातील इतर सदस्य घाबरले. त्यांनी दुपारी खाजगी रूग्णालयात उपचाराचे प्रयत्न केले. शेवटी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास स्थानीय उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नाफडे, डॉ.मितेश टावरी, डॉ.चव्हाण आदींच्या चमुने तात्काळ उपचार सुरू केले. प्राथमिक स्वरूपातील उपचारानंतर रूग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे. रूग्णांना विषबाधा नेमकी खिचडीमुळे झाली की अन्य स्वरूपातील अन्न सेवनाने झाली. याबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही.