अन्नातून आठ जणांना विषबाधा!
By Admin | Updated: May 6, 2017 02:39 IST2017-05-06T02:39:08+5:302017-05-06T02:39:08+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना

अन्नातून आठ जणांना विषबाधा!
मलकापूर (जि. बुलडाणा): येथील सायकलपुरा भागातील वृद्धासह सात चिमुकल्यांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बाधीत रूग्ण एकाच कुटुंबातील असून अंगणवाडीतून आणलेली खिचडी खाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यामन, सर्व जणांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अब्दुल सत्तार अ. कादर (७५) यांच्या कुटुंबातील सालीया फिरदोस अ.गफ्फार (१0), इम्रान हुसेन इरशाद हुसेन ( ६), अ.इमरान हुसेन (१२), अलकीया फिरदोस ( १0), नाझीया फिरदोस (१५), अब्दुल इमरान अब्दुल जब्बार (६), अ.सिद्दीक अ.जब्बार (४) अशा सात चिमुकल्यांनी पालीका अखत्यारीतील देशमुख हवेली सायकलपुरा येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंगणवाडीतील खिचडी घरी आणली. तीच खिचडी वृद्ध अ.सत्तार यांनी सेवन केली. सुमारे एक तासानंतर वृद्धासह सातही चिमुकल्यांना ओकार्या सुरू झाल्या. त्यामुळे परिवारातील इतर सदस्य घाबरले. त्यांनी दुपारी खाजगी रूग्णालयात उपचाराचे प्रयत्न केले. शेवटी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास स्थानीय उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल नाफडे, डॉ.मितेश टावरी, डॉ.चव्हाण आदींच्या चमुने तात्काळ उपचार सुरू केले. प्राथमिक स्वरूपातील उपचारानंतर रूग्णांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे. रूग्णांना विषबाधा नेमकी खिचडीमुळे झाली की अन्य स्वरूपातील अन्न सेवनाने झाली. याबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही.