बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:47 IST2020-05-17T10:47:24+5:302020-05-17T10:47:29+5:30

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६८१ आले आहेत.

Eight corona reports 'negative' in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेले आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ६८१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २६ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे. सध्या रूग्णालयात दोन रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
१६ मे रोजी आठ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व आठ अहवाल निगेटीव्ह आहेत. सध्या ७२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६८१ आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eight corona reports 'negative' in Buldana district