लाॅकडाऊनचा परिणाम; शेगाव आगाराचे दीड कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 12:01 IST2021-05-18T12:01:01+5:302021-05-18T12:01:15+5:30
State Transport News : एका महिन्यात तब्बल दीड कोटीचा व्यवसाय बुडाला आहे.

लाॅकडाऊनचा परिणाम; शेगाव आगाराचे दीड कोटींचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : मागील ३० दिवसांपासून जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या सर्व बसफे ऱ्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगाराला बसला आहे. एका महिन्यात तब्बल दीड कोटीचा व्यवसाय बुडाला आहे. आगारातील वाहक, चालक, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अडचण निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत व बाहेरील जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाण्यास कोरोनाच्या निर्बंधाने बंदी घातली आहे. त्याला एक महिना झाला आहे. सरासरी पाच ते साडेपाच लाख रुपये रोज शेगाव आगाराचा व्यवसाय होतो. तसेच उन्हाळ्यात हा व्यवसाय अधिक होतो.
पावसाळ्यात प्रवासी संख्या कमी असल्याने उन्हाळी हंगामात होणाऱ्या अधिकच्या व्यवसायाने पावसाळ्यात कमी होणारे उत्पन्न या काळात भरून येत होते.
नेमके हंगामाच्या दिवसात लालपरी जागेवर थांबल्याने दीड कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा शेगाव आगार व प्रवाशांना लागली आहे.
लग्न सराईमध्येच लागले कडक निर्बंध
मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान लग्न सराइई असल्याने प्रवाशी वाहतुक माेठ्या प्रमाणात वाढते. या तीन महिन्यांच्या काळात एसटी महामंडळाला माेठ्या प्रमाणात नफा मिळताे. मात्र,काेराेना संसर्गामुळे गत वर्षापासून एसटी बस बंद ठेवण्यात येत असल्याने महामंडळ ताेट्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.