शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हमीदराच्या अल्पवाढीमुळे कपाशी पेरणीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:48 IST

Agriculture News : शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत शेतमालास मिळणारे अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे. यानंतरही केंद्र शासनाने कापसाला २०० रुपयांचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   बुलडाणा जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन सोबतच शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मात्र, शेतमालास खर्चावर आधारित दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले आहे. अलीकडच्या काळात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. या अळीला नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये किमतीच्या फवारण्या कराव्या लागतात. यानंतरही अळीनियंत्रणाखाली येत नाही. खताच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ८०० रुपये किमतीचे खताचे पोते आता १२०० रुपयांवर गेले आहेत. मजुरीचे दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेलच्या किमती ९२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे मशागतीचे दर वाढले आहेत. कीटकनाशकांच्या किमती आवाक्याबाहेर आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलही कापसाचे उत्पादन होणे अवघड झाले आहे. 

एका एकराला ३० हजार खर्च; उत्पन्न १५ हजार एक एकरासाठी ३० हजारांचा खर्च येतो. मात्र, उत्पन्न १२ ते १५ हजारांचेच होत आहे. शेतकऱ्यांना १५ हजारांच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. कापसाचे उत्पादन आणि मिळणाऱ्या दरात कुठलाच ताळमेळ नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन सोडले आहे. 

उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हमी दरातही त्यानुसार वाढ व्हायला हवी. उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी शेती व्यवसायाची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळालेच नाही.- सुनील जाधव, वडगा पाटण, जळगाव जामोद 

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरी