पाथर्डी घाटात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:54 IST2017-09-15T00:54:22+5:302017-09-15T00:54:42+5:30

वाहनाच्या  धडकेत बिबट्या जागीच ठार  झाल्याची घटना पाथर्डी ता.मेहकर घाटात १४ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. या परिसरात तीन महिन्या त तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

Dypter killed in Pathardi Ghat by vehicle crash | पाथर्डी घाटात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

पाथर्डी घाटात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

ठळक मुद्देतीन महिन्यात तिसरा बळी!मेहकर तालुक्यातील पाथर्डी घाटात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : वाहनाच्या  धडकेत बिबट्या जागीच ठार  झाल्याची घटना पाथर्डी ता.मेहकर घाटात १४ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. या परिसरात तीन महिन्या त तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
मेहकर-खामगाव मार्गावर वरवंड ते पाथर्डी गावादरम्यान  असलेल्या पाथर्डी घाटात सायंकाळी ६ वाजेदरम्यान रस्ता  ओलांडत असलेल्या एक वर्षीय बिबट्यास अज्ञात वाहनाने  धडक दिल्याने बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला जावून  त्याच्या मानेजवळ जबर मार बसला. तसेच नाकातून  रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. सदर  घटना या मार्गावरुन जात असलेले प्रमोद देशमुख यांना  समजल्याने त्यांनी सदर बिबट्याच्या मृत्युच्या घटनेची माहि ती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील यांना मोबाईलद्वारे  कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन पाल नागरे, वनपाल संदीप परिहार, वनरक्षक देशमुख, फुले,  विभूते आदिंनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. रात्री  उशिरापर्यंत वनविभागाची कार्यवाही सुरू होती. 
जुलै महिन्यात जानेफळ येथील शाम गट्टाणी यांच्या शेतात       घडलेल्या बिबट्याच्या घातपाताच्या घटनेपासून  बिबट्याच्या मृत्युच्या सारख्या घटना सुरूच असून मागील  ऑगस्ट महिन्यात नजिकच्या हिवरा खुर्द येथे सुद्धा  बिबट्याच्या घातपाताची घटना घडलेली आहे. त्यातील  आरोपींचा अद्याप शोध लागलेला नसताना आज पाथर्डी  घाटात सुद्धा बिबट्या मृत्यू झाला. आजची घटना ही अपघात  असल्याची माहिती वनअधिकार्‍यांनी आमच्या प्रतिनिधींशी  बोलताना दिली आहे. 

Web Title: Dypter killed in Pathardi Ghat by vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.