शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:40 IST

पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसाळ््याचे अडीच महिने संपले असले तरी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्यांचा यात समावेश आहे. दुसरीकडे वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी घाटावरील चार तालुक्यात पावसाची सरासरी ही अन्य तालुक्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे येत्या काळात दमदार पाऊस न पडल्यास स्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्ह्यात एकीकडे दमदार पाऊस पडत असतानाच २० गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये मराठवाड्याच्या सिमेलगतच्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या दोन तालुक्यातच तब्बल १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर संग्रामपुर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडलेला असतानाही दोन गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. जवळपास गेल्या १८ महिन्यापासून संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आमि पेसोडा या दोन गावांना एका टँकरद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा विरोधाभास आहे. जिल्ह्यातील या २० गावांमध्ये सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.एकीकडे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झालेला आहे तर जिल्ह्यातील सात पैकी दोनच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मोठ्या प्रकल्पापैकी एकमेव पेनटाकळी प्रकल्पामध्ये आजच्या घडीला ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा अपवाद वगळता अन्य प्रकल्पांमध्ये अपेक्षीत जलसाठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती नेमके कोणते रुप धारण करते हे प्रत्यक्ष पावसाळा संपुष्टात आल्यानंतरच स्पष्ट होईल. शारंगधराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहकर शहराला आज घडीला दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. कोराडी प्रकल्पात आजच्या घडीला शुन्य टक्के पाणीसाठा असून केवळ ४.१६ दलघमी मृतसाठा आहे. त्यावरून परिस्थितीची कल्पना यावी. त्यामुळे पुढील काळात देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांसाठी जिवन वाहीनी म्हणून गणल्या जात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पामध्येही सध्या मृतसाठा आहे. २०१३-१४ नंतर हा प्रकल्पच पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. केवळ मृतसाठ्यावरच मातृतिर्थ सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा शहराची तहान कशीबसी भागवली जात आहे. यंदा मात्र या प्रकल्पाच्या मृतसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये १.२८ टीएमसी एवढा मृतसाठा आहे.या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठानांदुरा तालुक्यातील निमगाव या एकाच गावाला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, जागदरी, उमरद, खामगाव या चार गावांना, संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आणि पेसोडा, चिखली तालुक्यातील असोला बुद्रूक, कोलारा, चंदनपूर आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक, उंबरखेड, चिंचोली बुद्रूक, कुंभारी, नागणगाव, अंभोरा, गिरोली खुर्द, पांग्री, गोळेगाव, आळंद या २० गावांना सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई