विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमुळे रेल्वेला पाच लाखांचे उत्पन्न

By Admin | Updated: July 4, 2017 00:16 IST2017-07-04T00:16:57+5:302017-07-04T00:16:57+5:30

खामगाव : आषाढी एकादशी यात्रेसाठी खामगाव येथून सुरू करण्यात आलेल्या विशेष विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमुळे खामगाव रेल्वे स्थानकाला तब्बल ४ लाख ८१ हजार ७३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Due to Vitthal Darshan Express the train generated five lakh rupees | विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमुळे रेल्वेला पाच लाखांचे उत्पन्न

विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमुळे रेल्वेला पाच लाखांचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आषाढी एकादशी यात्रेसाठी खामगाव येथून सुरू करण्यात आलेल्या विशेष विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमुळे खामगाव रेल्वे स्थानकाला तब्बल ४ लाख ८१ हजार ७३५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या विशेष विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसचा लाभ ३२४८ भाविकांनी घेतला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीची आस भाविकांना लागलेली असते. या भाविकांसाठी यावर्षी येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींची पहिली फेरी रवाना झाली. पहिल्या फेरीने ४६७ भाविकांनी पंढरीची वाट धरली.
यापासून येथील रेल्वे स्थानकावर ४०२ तिकिटांची विक्री झाली. या एक्स्प्रेसचे खामगाव ते पंढरपूरपर्यंत प्रवास भाडे १९५ रुपये, ज्येष्ठ महिलेसाठी १०० रुपये, ज्येष्ठ पुरुष १२० रुपये आकारण्यात आले. यापासून येथील रेल्वे स्थानकाला ४४ हजार ११५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर २९ जून रोजी दुसरी फेरी, १ जुलै रोजी तिसरी फेरी आणि २ जुलै रोजी चौथी फेरी रवाना झाली. या चारही फेऱ्यांमध्ये ३२४८ भाविकांनी पंढरीची वाट धरली. या फेऱ्यांच्या माध्यमातून खामगाव रेल्वे स्थानकाला ४ लाख ८१ हजार ७३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

रेल्वे आणि सामाजिक संघटनांकडून व्यवस्था
भाविकांना तिकीट घेताना गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त खिडकीसद्धा सकाळपासून सुरू करण्यात आली होती. तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक संजय भगत, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक यांच्यासोबतच उपस्टेशन प्रबंधक सुरेश गोळे, कुणालकुमार, बुकिंग लिपिक प्रशांत बनसोड, सोनाजी तेलगोटे, नीरज मिलिंद, टी.आय. देशपांडे, सी.आय. निकम, इंद्रपाल म्हैसकर, व्ही.आर. वानखडे, उमाबाई व इतरांनी परिश्रम घेतले.

Web Title: Due to Vitthal Darshan Express the train generated five lakh rupees