नवविवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST2017-09-27T00:17:33+5:302017-09-27T00:18:01+5:30
मलकापूर पांग्रा : येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा जाधव वय १९ वर्षे हीचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान विहिरीवर पाणी भरायला गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

नवविवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर पांग्रा : येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा जाधव वय १९ वर्षे हीचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान विहिरीवर पाणी भरायला गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मलकापूर पांग्रा येथील पांग्रा गावातील रहिवाशी नामदेव कसारे यांची मुलगी माधुरी हीचे याच वर्षी मे महिन्यात जवळच असलेल्या पोफळशिवनी येथील कृष्णा जाधव सोबत लग्न झाले होते. तिचा नवरा पुण्याला मोलमजुरी करण्यासाठी गेला असल्याने ती माहेरी आली होती. ती मंगळवारला दुपारी घरामागील स्मशानभूमिजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता, तिचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या गयाबाई हरिदास टाले या महिलेने आरडा ओरड केली असता, तिला वाचविण्यासाठी गावातील तरुणानी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी जाफौ १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार एस. एस. इंगळे करीत आहेत.
गळफास लावून इसमाची आत्महत्या
डोणगाव : येथून जवळच असलेल्या बेलगाव येथील एका ४0 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबरला घडली. बेलगाव येथील यादव महादा घायवट (४0) याने राहत्या घरात पत्र्याखालील लाकडाला गळफास घेऊन आ त्महत्या केली. याप्रकरणी संभाजी महादा घायवट यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी जा.फौ. कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉं गजानन धोंगडे हे करीत आहेत.