शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:05 PM2018-05-04T17:05:51+5:302018-05-04T17:05:51+5:30

सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

Due to the decline in agricultural commodity prices farmer frustrated | शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

Next
ठळक मुद्देसात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले.शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे.

 सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यां चा गांभीर्याने विचार केला नाही. पाच वर्षांपुर्वी कापसाला ६ ते ७ हजार प्रतीक्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. तोच कापूस आज ४ ते ५ हजार रुपयापर्यंत विकावा लागत आहे. यावर्षी सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले. शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा चालविताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

निसर्गाचासुद्धा समतोल ढासळत चालला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी उघाड पडल्यामुळे नापिकी होऊन शेतकरी त्रस्त आहे. एवढ्या संकटामधून हाती आलेल्या शेतमालाला शासनाच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. राज्यकर्त्यांनी खुर्च्या टिकविण्यासाठी सबसीडीच्या नावावर कांदाचाळ, पीयुसी पाईप, विहिरी, मोटारपंप, शेडनेट, शेततळे देऊन शेतकऱ्यांप्रती मदत देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. परंतु आजही असंख्य शेतकऱ्यांचे सबसीडीचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने एक वर्षापुर्वी लाखो टन तूरदाळ, चनादाळ, तेल, रुईच्या गाठी, गहू आयात केल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. सात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या घरात कापूस साठवून आहे. 

 

 तूर खरेदी घटली

गत वर्षी सिंदखेडराजा तालुक्यात ५५ हजार क्विंटल तुरीची खरेदी शासनाने केली. यावर्षी मात्र १०-१२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर ३० ते ३५ हजार क्विंटल तूर शेतकºयांच्या घरात पडून आहे. सिझनमध्ये २५०० ते २८०० रु. सोयाबीनचे भाव होते. शेतकºयांचे सोयाबीन संपले व सध्या २७०० रुपयाने बाजारभाव वाढले. टोमॅटो ५ रुपये किलोने विकत आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही वस्तुस्थिती असून शासन शेतकºयांचा विचार कधी करणार हा खरा प्रश्न आहे.

 

Web Title: Due to the decline in agricultural commodity prices farmer frustrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.