मलगी येथे १६ बक-यांचा होरपळून मृत्यू

By Admin | Updated: December 6, 2015 02:35 IST2015-12-06T02:35:51+5:302015-12-06T02:35:51+5:30

चिखली तालुक्यातील घटना, काळोना फाट्यानजीक गोठय़ाला आग.

Due to the death of 16 people in Mali | मलगी येथे १६ बक-यांचा होरपळून मृत्यू

मलगी येथे १६ बक-यांचा होरपळून मृत्यू

चिखली (जि. बुलडाणा) : तालुक्यातील मलगी येथील काळोना फाट्यानजीक असलेल्या गोठय़ाला रात्री ११ वाजेच्या सुमारास आग लागून १६ बकर्‍यांचा अक्षरश: कोळसा झाल्याची घटना ४ डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेने शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाचा पर्याय निवडणार्‍या शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून ही घटना दुष्काळातील तेरावा महिना ठरली आहे. तालुक्यातील मलगी येथील काळोना रोडवर सखाराम राजाराम जाधव, परमेश्‍वर सखाराम जाधव व रामेश्‍वर जाधव यांची एक हेक्टर जमीन आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने या कुटुंबाने शेतीवर भागत नसल्याचे हेरून मोलमजुरीसह शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालनाचा पर्याय निवडला होता. त्यांच्याकडे १0 बकर्‍या व ६ पिल्ले असल्याने दररोज गोठय़ावर जागलीसाठी जावे लागत होते; मात्र ४ डिसेंबर रोजी या कुटुंबातील पुरुष मंडळींना बाहेरगावावरून घरी येण्यास उशीर झाल्याने रात्री जागलीवर कोणी जाऊ शकले नाही. अशातच रात्री ११ वाजेच्या सुमारास गोठय़ातील दिवा खाली पडल्याने गोठय़ाला भीषण आग लागली. यामध्ये १८ पैकी १६ बकर्‍या मृत्युमुखी पडल्याची नोंद घेण्यात आली. यावेळी पोलीस पाटील भगवान शेळके, दिलीप शितोळे, नवृत्ती पवार, ङ्म्रीकांत राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सनाईक यांची उपस्थिती होती. अत्यल्प शेतजमीन त्यात आधीच दुष्काळ आणि अशातच मोलमजुरी करताना मोठय़ा आशेने शेळीपालनाचा व्यवसाय करणार्‍या या शेतकरी कुटुंबावर हा आघात झाल्याने जाधव कुटुंबीय पुरते कोलमडून पडले आहे. शासनाने त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Due to the death of 16 people in Mali