Due to the 'backwater' of lower Dnyan Ganga, 15 houses in Divthana were affected | निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १६० कोटीतून दिवठाणा येथे निम्न ज्ञानगंगा प्रकल्प तयार करण्यात आला. यावर्षी पासून पाणी अडवण्यास सुरवात झाली. मात्र पुर्नवसनाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.
‘साहेब, आम्हाला राहायला घर द्या’ अशाप्रकारची आर्त मागणी दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गटविकास अधिकाºयांकडे केली. मात्र हतबल असल्याचे कारण पुढे करत त्यांनीही वरिष्ठांकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याने नागरिक संतप्त झाले होते.
प्रकल्पामुळे १,१८१ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात अतिक्रमीत वस्तीचे देखील स्थलांतर करण्याचे काम काही दिवसापूर्वी झाले. मात्र जागा वाटपात दुजाभाव केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्याच पावसाळ््यात प्रकल्प ७० टक्के भरला आहे. यामुळे प्रकल्पाच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दिवठाणा येथील काही कुटूंबांना काळेगाव शिवारात प्लाटॅ दिले. त्याठिकाणी आपआपल्या सोईने काहींनी राहण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. सुमारे ११०० लोकवस्तीच्या गावातील अनेक कुटूंब अजूनही आहे त्याच जागी राहत आहेत. १५ सप्टेंबररोजीपासून प्रकल्पातील पाणी गावात शिरत आहे. पाण्यामुळे पाच ते सहा घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी प. स. मध्ये ग्रामस्थांनी व्यथा मांडली होती.


आमच्या गावातील काही लोकांना काळेगाव शिवारात प्लॉट दिले आहेत. मात्र अद्याप अनेक जण बाकी आहेत. त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सुभाष वाकुडकर,
सामाजिक कार्यकर्ते.


दिवठाणा येथील काही नागरिकांनी प्लॉट देण्यात आले. काही बाकी आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे. त्यांचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडविण्यात येईल.

- सुमीत जाधव,
गटविकास अधिकारी, खामगाव

Web Title:  Due to the 'backwater' of lower Dnyan Ganga, 15 houses in Divthana were affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.