पावसाअभावी परिसरातील पिकांनी टाकल्या माना

By Admin | Updated: August 18, 2014 00:16 IST2014-08-18T00:11:04+5:302014-08-18T00:16:03+5:30

इसोली परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

Due to the absence of rain, considerations of crop failure in the area | पावसाअभावी परिसरातील पिकांनी टाकल्या माना

पावसाअभावी परिसरातील पिकांनी टाकल्या माना

इसोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाची सुरुवातीची बळीराजाची हुकमी नक्षत्र कोरडी गेलीत. उशिरा सुरु झालेल्या रिमझीम पावसावर थोड्या प्रमाणात बळीराजाने संपूर्ण क्षेत्रावर सोयाबीन, तूर या पिकांची पेरणी केली. परंतु बियाणे घरगुती असल्याने त्याची उगम क्षमता कमी असल्याने ते उगवलेच नाही. परिणामी दुबार पेरणी केली. परंतु पावसाने गेल्या १५ दिवसापासून दडी मारल्याने उगवलेले इवलेसे रोपटे वाळत असून या निसर्गाच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
इसोली परिसरातील बळीराजाने पेरणी केली. मात्र, पिके न उगवल्याने अनेकांवर बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. दुबार पेरणी करुण १५ दिवसाचा कालावधी झाला तरी सुध्दा पाऊस न आल्याने थोड्याफार प्रमाण उगवन झालेले सोयाबीन पिके ही करपत असून सदर पिके ही वाळत आहेत. या प्रकाराने बळीराजा मात्र हवालदिल झाला असून सतत आभाळाकडे पाहत आहे. आज येईल उद्या येईल या केवळ आशेवर आहेत. कृषी विभागाकडून वाळत असलेल्या सोयाबीन या पिकाचा सर्व्हे करुन मदतीची मागणी केली आहे. या भागात १५ दिवसापासून पाऊस नसल्याने नुकतेच जमिनीच्या वर आलेली पिके कोमेजली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. आधीच पाणी टंचाईग्रस्त असलेल्या या भागात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची परिस्थिती समोर ठाकली आहे. संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना होणे गरजेचे असल्याची अपेक्षा इसोलीसह तालुक्यातील शेतकर्‍यांना आहे. दुबार पेरणीने कंबरडे मोडलेला शेतकरी जगविण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Due to the absence of rain, considerations of crop failure in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.