‘डीटीई’ची वेबसाइट ‘फेल’!

By Admin | Updated: August 15, 2016 02:35 IST2016-08-15T02:35:45+5:302016-08-15T02:35:45+5:30

खामगाव येथील शासकीय तंत्र निकेतनच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप.

DTE website 'fail'! | ‘डीटीई’ची वेबसाइट ‘फेल’!

‘डीटीई’ची वेबसाइट ‘फेल’!

खामगाव(जि. बुलडाणा), दि. १४ : : शासकीय तंत्र निकेतन, खामगाव येथे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला प्रवेश निश्‍चितीसाठी आलेल्या सुमारे साडेपाचशे विद्यार्थ्यांना रविवारी मनस्ताप सहन करावा लागला. डीटीई (डायरेक्ट्रोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) ही वेबसाइट (सर्व्हर लिंक अभावी) फेल झाल्याने, तब्बल सहा तास रांगेत घालविल्यानंतरही अनेकांची प्रवेश निश्‍चिती होऊ शकली नाही. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले असून, विद्यार्थ्यांसह पालकवर्गामध्येही याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: DTE website 'fail'!