थंडीमुळे सुकामेवा खातोय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:00 PM2018-12-29T12:00:31+5:302018-12-29T12:02:42+5:30

खामगाव : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत आरोग्याला पोषक असलेले लाडू तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. सुकामेवा साहित्य खरेदीला बाजारात तेजी आल्याचे दिसून येत आहे

Dry food demand increase due to cold! | थंडीमुळे सुकामेवा खातोय भाव!

थंडीमुळे सुकामेवा खातोय भाव!

Next
ठळक मुद्देआरोग्यदृष्ट्या फायदेशीर असलेले डिंक, मेथी व सुक्यामेव्याचे लाडू बनविण्याला प्राधान्य दिले जात आहे. बाजारपेठेत फेरफटका मारला असता सुकामेव्याच्या मागणीत दिवाळीनंतर दुपटीने वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत आरोग्याला पोषक असलेले लाडू तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. सुकामेवा साहित्य खरेदीला बाजारात तेजी आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तयार पौष्टिक लाडूदेखील बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यांना मागणी बºयापैकी आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऋतुमानात सातत्याने बदल होत आहे. आॅक्टोबरपर्यंत पावसाने बेमोसमी हजेरी लावल्याने नोव्हेंबरमध्ये पडणारी थंडी महिनाभर लांबली. आता कुठे डिसेंबरच्या तिसºया आठवड्यात शहरातील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी शहरात फिरणाºयांची संख्या वाढली आहे. याशिवाय जीम, व्यायामशाळा, योगासने आदींकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच शरीराला पौष्टिक आणि आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असलेले डिंक, मेथी व सुक्यामेव्याचे लाडू बनविण्याला प्राधान्य दिले जात आहे. विशेषत: गुडघेदुखी, संधीवात, हृदयरोग, मधुमेह आदी व्याधींवर हिवाळ्यात पौष्टिक लाडू खाण्यास सांगितले जाते. हिवाळ्यात मेथी, डिंक व उडदाचा वापर करण्यात आलेले लाडू खाल्ल्यास कंबर, पाठ व मानदुखीचे प्रमाण दूर होते.  खामगाव शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारला असता सुकामेव्याच्या मागणीत दिवाळीनंतर दुपटीने वाढ झाली आहे. याशिवाय काही ठिकाणी  हिवाळ्यातील तयार लाडू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तयार लाडूंना वाढती मागणी!

सध्या बाजारात काजू ४४0 ते ७00 रुपये प्रती किलो, बदाम ७00 ते ७४0, आक्रोड ९६0 ते १२00, डिंक ४00, पिस्ता हिरवा १५00, अंजिर ४00 ते ६00, खारीक ९0 ते १४0, खोबरा २00 ते २४0 रुपये किलो आहे. बाजारात सध्या तयार लाडूंना देखील मागणी आहे. डिंक व मेथीचे लाडू, उडीद दाळीचे लाडू आणि सुकामेव्याचे लाडू, असे विविध प्रकार त्यात आहेत. या लाडूंनाही बºयापैकी मागणी असल्याचे चित्र आहे.

 

दिवाळीनंतर हिवाळ्यात सुका मेव्याला विशेष मागणी असते. म्हणून ग्राहकांच्या मागणीनुसार साठा करण्यात येत असतो. भाव स्थिर असून, डिसेंबर ते जानेवारीत सुका मेव्याला अधिक प्रतिसाद मिळतो.

- विवेक जैन, सुका मेवा होलसेल विक्रेते. खामगाव.

Web Title: Dry food demand increase due to cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.