शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यात दुष्काळी मदतीची आशा धूसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:03 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेली दुष्काळी मदतीची आशा धूसर होत चालल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेली दुष्काळी मदतीची आशा धूसर होत चालल्याचे चित्र आहे.पहिल्या यादीत समावेश असलेल्या तालुक्यांमधिल शेतकऱ्यांनाच सध्या दुष्काळी मदत निधीचे वितरण झाले आहे. त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील विविध गावांसह पाच तालुक्यांमधिल शेतकºयांची आशा मावळण्याची चिन्हे आहेत.गत खरिप हंगाम हातून गेल्याने राज्य शासनाने प्रथम १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यानंतर उर्वरित तालुक्यांमधूनही ओरड झाली. परिणामी दोन टप्प्यात उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना हेक्टरी ६८०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ही मदत दोन टप्प्यात देण्याचे ठरले. त्यानुसार १५१ तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळग्रस्त निधीचा पहिला हप्ता मंजूर होवून वितरित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी आठ तालुके १५१ दुष्काळी तालुक्याच्या यादीत आले होते. परंतु पाच तालुक्यांचा मात्र त्यामध्ये समावेश नव्हता. त्यानंतर पाच तालुक्यातील काही महसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर झालीत. आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित महसूल मंडळांचा समावेश दुष्काळी म्हणून करण्यात आला.दुष्काळी मदत त्यांना मिळालीच नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने उर्वरित शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.या तालुक्यांमधिल शेतकºयांचा परिस्थिती गंभीर!जिल्ह्यातील जळगाव जामोद, बुलडाणा, चिखली, मेहकर व देऊळगाव राजा या पाच तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सर्वात शेवटी करण्यात आला होता. परंतु दुष्काळी निधी वितरणाबाबत अद्याप या पाच तालुक्यांसाठी काहीही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ