दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:44 IST2019-08-12T20:43:33+5:302019-08-12T20:44:20+5:30
दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली

दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली
href='https://www.lokmat.com/topics/malkapur/'>मलकापूर: दसरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी अचानक कोसळल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मुक्ताई नगर रोडवर मौजे दसरखेड हे गाव असून या गावाची लोकसंख्या सुमारे 1 हजार 600 आहे. या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात जवळपास ४ते५ वर्षाआधी निर्मिती करण्यात आलेली होती.ही पाण्याची टाकी आज सायंकाळी अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु या टाकीच्या बाजूला मौजे दसरखेडला वीज पुरवठा करणारी डीपी होती. या डीपी वरून मुख्य लाईन ही दसरखेड गावात जात होती या डीपीवर जर ही पाण्याची टाकी कोसळली असती तर निश्चितच येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली असती असेच चित्र घटनास्थळी दिसून आले. मात्र सुदैवाने ती टाकी बाजूला पडल्याने कुणालाही क्षती पोहचली नाही. परंतु ही टाकी पडलीच कशी?असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी रोष व्यक्त करीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्यानेच टाकी पडली असा आरोप करीत आता आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार तरी कसा? असा प्रश्न प्रत्येकाकडून उपस्थित होताना दिसून आला. घटना कळताच शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, सरपंच संतोष साठे सह ग्रामस्थांनी तात्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी स्थानीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. पाण्याची टाकी पडल्याचे कळताच आम्ही घटना स्थळाकडे धाव घेतली गावकऱ्यांना शांतही केले. महत्त्वाचे म्हणजे ही पाण्याची टाकी अद्याप पावेतो दसरखेड ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली नव्हती.- संतोष साठे सरपंच दसरखेड