पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात शोषखड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:57+5:302021-07-27T04:35:57+5:30

येथील पोलीस स्टेशनच्या आवारात पावसाचे पाणी निचरा होत नसल्यामुळे तुंबत होते. पाऊस पडल्यानंतर पोलीस स्टेशन आवारातील तसेच पोलीस स्टेशनच्या ...

Drainage pits in the police station premises for drainage | पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात शोषखड्डे

पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात शोषखड्डे

येथील पोलीस स्टेशनच्या आवारात पावसाचे पाणी निचरा होत नसल्यामुळे तुंबत होते. पाऊस पडल्यानंतर पोलीस स्टेशन आवारातील तसेच पोलीस स्टेशनच्या समोरील रस्त्यावरून वाहत येणारे पाणी पोलीस स्टेशन आवारात जमा होत होते. त्यामुळे दैनंदिन काम करण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. वाहनांना ने आण करण्यास सुद्धा अडचण होत होती. पावसाळ्याचे चार महिने हा त्रास सहन करावा लागत होता. ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्याशी याबाबत चर्चा केली. सिंदखेडच्या सरपंच सीमा प्रवीण कदम यांनी स्वखर्चाने दोन शोष खड्डे पोलीस स्टेशनच्या आवारात तयार करून दिले. त्यासाठी त्यांना सुमारे २५ हजार रुपये खर्च आला. दहा बाय दहा आणि दहा बाय सहा या आकाराचे हे दोन शोष खड्डे करण्यात आले आहेत. यामुळे पोलीस स्टेशन आवारातील तसेच बाहेरून येणाऱ्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन वाया जाणारे पाणी परत जमिनीत जाईल.

Web Title: Drainage pits in the police station premises for drainage