अजगराने केली शेळीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST2021-05-10T04:35:20+5:302021-05-10T04:35:20+5:30

अमडापूर : ब्राम्हणवाडा शिवारात एका शेळीची अजगराने शिकार केल्याची घटना ८ मे राेजी सायंकाळी घडली़ अजगराच्या तावडीतून शेळीला ...

The dragon hunted the goat | अजगराने केली शेळीची शिकार

अजगराने केली शेळीची शिकार

अमडापूर : ब्राम्हणवाडा शिवारात एका शेळीची अजगराने शिकार केल्याची घटना ८ मे राेजी सायंकाळी घडली़ अजगराच्या तावडीतून शेळीला वाचविताना ग्रामस्थांना कसरत करावी लागली़ यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला तर अजगरही ठार झाला.

अमडापूर येथील प्रल्हाद जाधव यांच्या मालकीच्या १२ ते १५ शेळ्या आहेत. या शेळ्या ८ मे राेजी सायंकाळी ब्राम्हणवाडा धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला चरत हाेत्या़ त्यातील एका शेळीवर अजगाराने हल्ला केला़ शेळीला पूर्ण आटाेळे मारल्याने शेळी जाेरात ओरडत हाेती़ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शेळीवर अजगराने हल्ला केल्याचे त्याच्या निदर्शनास आले़ त्यांनी शेळीचे प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केली़ मात्र आजूबाजूला कुणी नसल्याने त्यांचा मुलगा आणि जाधव यांनी अजगराला ठार केले. मात्र तोपर्यंत शेळीही ठार झाली हाेती़ या घटनेमध्ये जाधव यांचे १० ते १२ हजारापर्यंतचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे़

Web Title: The dragon hunted the goat