खेर्डा येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट

By Admin | Updated: February 28, 2015 01:09 IST2015-02-28T01:09:52+5:302015-02-28T01:09:52+5:30

सिलिंडर लिक झाल्याने घटना; सुदैवाने जिवीत हानी टळली.

Domestic cylinders explosion at Khedda | खेर्डा येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट

खेर्डा येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): तालुक्यातील खेर्डा बु. येथील भास्कर बळीराम तायडे यांच्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी टळली. संध्याकाळी स्वयंपाक करीत असताना रेग्यूलेटरजवळ लिक असलेल्या सिलिंडरने अचानक पेट घेतला. तेव्हा सदर गृहिणीने घाबरुन बाहेर पळ काढला तेव्हा आरडाओरड करीत काही लोक जमली तेवढय़ात केवळ पाच मिनीटातच त्या सिलिंडरचा स्फोट झाला व त्यातूनही गॅस बाहेर येवू लागला व त्यानेही पेट घेतला.
त्यामुळे आजुबाजूला असलेल्या कुळाने पेट घेतला. त्यातच सदर आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात त्याची मुले नंदकिशोर तायडे व अनंता तायडे हे किरकोळ जखमी झाले. थोडक्यात मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने जीवि तहानी झाली नाही.

Web Title: Domestic cylinders explosion at Khedda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.