कोणी लस देता का लस ? खासगी रुग्णालयांमध्ये दुष्काळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:27+5:302021-07-23T04:21:27+5:30
आतापर्यंत झालेले लसीकरण पहिला डोस ५५२६१६ दुसरा डोस १७४८९२ १८ ...

कोणी लस देता का लस ? खासगी रुग्णालयांमध्ये दुष्काळ!
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस ५५२६१६
दुसरा डोस १७४८९२
१८ ते ४५ वयोगट २०८७६१
४६ ते ५९ २५९५९०
६० पेक्षा जास्त २५९१५७
शासकीय रूग्णालयांत १० हजार डोस,
खासगी रुग्णालयांमध्ये ००
१. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे १० हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोव्हॅक्सिनचे सहा हजार डोस व कोविशिल्डचे ४ हजार डोसचा समावेश आहे.
२. खासगी दवाखान्यामध्ये लस उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात लसच उपलब्ध नाही.
ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्याची गरज
आजही ग्रामीण भागातील अनेक युवकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिलाच डाेस मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.
सिद्धेश्वर देशमुख, लस लाभार्थी.
मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. सध्या लसीकरण केंद्रावर वाढती गर्दी बघता त्या गर्दीत जाणे म्हणजे धोक्याचे वाटते. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी.
निलेश शिंदे, लस लाभार्थी.
लसीकरण सुरळीत सुरू आहे
सध्या लसीकरणाचे १० हजार डोस आपल्याकडे उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. सरकारी लसीकरण केंद्रावर लस देण्याची मोहीम सुरळीत सुरू आहे.
डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.