दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST2021-04-21T04:34:11+5:302021-04-21T04:34:11+5:30

असे लागणार साहित्य घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर अशी करा चाचणी आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची ...

Do a six minute walk test at home every day! | दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !

दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !

असे लागणार साहित्य

घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर

अशी करा चाचणी

आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.

...तर घ्या काळजी

सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३पेक्षा कमी झाली तर, चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर, चालल्यानंतर धाप येणे दम लागल्यासारखे होत असेल तर, तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

कोणी करायची ही टेस्ट?

सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर, गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.

कोविड रुग्णालयात चाचणी

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची नियमित ही चाचणी घेतली जात आहे. यामुळे प्रत्येक रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. अनेकांनी ही टेस्ट घरीच सुरू केल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याची वेळीच माहिती मिळते.

Web Title: Do a six minute walk test at home every day!