‘उंद्री ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:58+5:302021-08-22T04:36:58+5:30

ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे की, ...

'Do not give extension to Undri Gram Panchayat traders' | ‘उंद्री ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नका’

‘उंद्री ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नका’

ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे की, विहित कालावधीत आपणाकडे असलेली व्यापारी गाळ्यांची भाड्याची रक्कम व नियमानुसार परवानगी न घेतल्यास पोलीस संरक्षण घेऊन व्यापारी गाळे खाली करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यावेळी प्रशासनास सहकार्य करावे, असे नमूद केले आहे. गाळेधारकांनी रीतसर परवानगी घ्यावी, असे नोटीसमध्ये सुचवले आहे. नियमानुसार त्याच गाळेधारकांना पुन्हा या गाळ्याबाबत परवानगी देणे किंवा मुदतवाढ देणे, हे बेकायदेशीर ठरू शकते. कारण, त्यांच्या करारनाम्याची मुदत कित्येक वर्षे झाले संपलेली आहे, तसेच गाळे दुसऱ्यांना भाड्याने दिले आहेत. सर्वच गाळेधारक थकबाकीदार आहेत, तर नोटीसमध्ये परवानगी घेण्याबाबत नमूद केले आहे, तसेच गाळेधारकांना मुदतवाढ देण्यात येऊ नये व नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे गाळे खाली करून घेण्यासाठी पोलीस संरक्षणाकरिता ठराव घेण्यात यावा; अन्यथा गाळे खाली करून हर्राशी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व गावातील युवक, अपंग बांधवांच्या वतीने उंद्री ग्रामपंचायतीसमोर लोकशाही मार्गाने, तसेच कोरोनाचे नियम पाळून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग) उदयनगर (उंद्री) शहराध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिखली तालुका उपाध्यक्ष राजीक खान, तसेच गावातील युवक, अपंग बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर राजिक खान, रफिक शेख, गजानन मापारी, अपंग सेलचे विनायक नसवाले, गजानन गावंडे यांच्यासह अनेकांची स्वाक्षरी आहे.

Web Title: 'Do not give extension to Undri Gram Panchayat traders'