शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:10 IST

खामगाव: अकोला वन्य जिव विभागा अंतर्गत येणाºया ज्ञानगंगा अभयारण्यात १८, १९ मे रोजी चंद्रप्रकाशात पर्यटकांनी वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अकोला वन्य जिव विभागा अंतर्गत येणाºया ज्ञानगंगा अभयारण्यात १८, १९ मे रोजी चंद्रप्रकाशात पर्यटकांनी वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले. एकूण ५२ पर्यटकांनी निसर्ग अनुभूती घेतली. यावर्षी वन कर्मचाºयांसह पर्यटकांना ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.यावर्षी अभयारण्यात प्राण्यांसाठी ४० पानवठे तयार करण्यात आले होते. पर्यटकांना बसण्यासाठी ४० मचानांची उभारणी करण्यात आली. या मचानांद्वारे पर्यटक तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी प्राणी बघत निसर्ग अनुभूती घेतली. यावर्षी एकूण ४० मचानांवर ५२ पर्यटकांना प्रवेश देण्यात आला.  प्रत्येक पर्यटकाकडून ६१५ रुपये प्रवेश घेण्यात आली. यातून पर्यटकांना जेवन, नास्ता, चहा, बिस्कीट, ग्लुकोज, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच पर्यटकांसोबत गाईड देण्यात आला. पर्यटकांना वन विभागाच्या वाहनाद्वारे मचानापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती संतोष डांगे यांनी दिली. गतवर्षी २०१८ च्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची संख्या २८ ने वाढलेली दिसून आली. दरम्यान यावर्षी अमरावतीचे रेड्डी विभागीय वन अधिकारी खैरनार यांच्या मार्गदर्शनात खामगावचे वन परीक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनपरीक्षेत्र अधिकारी बुलडाणा मयूर सुरवसे, ओवे, अमोल सावंग, निसर्गप्रेमी वनपाल राठोड, वनरक्षक झोटे, कर्मचारी विनकर, जटाले, महारनर, निलावर, पाटील, अमित शेख, संजिवनी पारोडे, कु.ताठे, एन.एस. गोरे आदींच्या उपस्थितीत पर्यटकांनी निसर्ग अनुभव घेतला.

 असे झाले प्राणी दर्शन!सन २०१९ या वर्षात पर्यटक आणि वन विभागाच्या निरिक्षणानुसार बिबट-०२,  अस्वल-११, रान डुक्कर-४८८, सांबर २५, बारकिंग डिअर (भेडकी) - ५, स्पोअरटेट डिअर (चितळ) - ५८,  निल गाय - १९९, काळविट - १०८, मोर - ०६, तडस - ०१, माकड - ७९, सायळ - ०६ या प्रमाणे वन्य प्राण्यांचे दर्शन झाले.  सन २०१८ मध्ये १२९ वन्य प्राणी आढळून आले होते. यावर्षी ही संख्या ९८२ पर्यंत पोहचली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावwildlifeवन्यजीवforestजंगल