शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला उपजिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 3:04 PM

कोरोना रूग्णांनासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयातील स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी बुधवारी दुपारी उपजिल्हा सर्वोपचार रूग्णालयाला भेट दिली. येथे कोरोना रूग्णांनासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डाची पाहणी केली. संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा पॉझिटीव्ह रूग्ण अद्यापपर्यंत खामगाव शहरात आढळून आलेला नाही. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे.   या रूग्णाला बुलडाणा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील संशयास्पद असलेल्या तसेच अहवाल निगेटीव्ह आलेल्या रूग्णांना खामगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी बुधवारी खामगाव आणि शेगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली. रूग्णालयातील अत्यावश्यक सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्याशी चर्चा केली. रूग्णालयातील उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक् केले. अतिरिक्त वार्डासाठी पाहणीभविष्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढल्यास, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात अतिरिक्त आयसोलेशन वार्ड तयार केल्या जाऊ शकतो का? या शक्यतेची पडताळणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने तत्पर राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल