शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात अतीपावसाने जमिनी खरडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:31 IST

अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून पर्जन्यमानाच्या टक्केवारीत बुलडाणा, शेगावने शंभरी पार केली आहे. आतापर्यंत अनेक नद्यांना पूर गेला आहे. अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.संततधार सुरू असलेल्या पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आहे. तर अनेकठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या वरुणराजाने आठवड्यापासून दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाख्याने जमिनी खरडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाच दिवसांत पैनगंगा नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानाचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. बुलडाणा तालुक्यात २६ जूनच्या रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे पैनगंगेला दुसऱ्यांदा पूर गेला. ही अतिवृष्टी व पुराचे पाणी काठावरील शेतात घुसल्याने शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरातील शेत जमिनींचा समावेश होता. दरम्यान, २६ जुनच्या रात्री पुरात वाहून जाणाºया मारुती स्वीफ्ट कारमध्ये दोघे जण असल्याचे निष्पन्न झाले. रात्री १० वाजताच्या सुमारास प्रमोद सपकाळ व गजानन धोटे (रा. कोलवड) कार (क्रमांक एम -एच- २८ -बी- बी- १३९५) ने जात असताना त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहू लागली.यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत दोघांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अविनाश सपकाळ यांनी २७ जून रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा शहर पोलिसांना दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के म्हणजे पाऊस झाला आहे. एकूण पावसाची १३४७.२ मि.मी. नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक शेगाव तालुक्यात १५३.८ मि.मी. म्हणजे १२७.१७ टक्के पाऊस झाला आहे. तर बुलडाणा तालुक्यात १७०.७ मि.मी. म्हणजे १०७ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी