जिल्हा कृषी हवामान केंद्राने साधला शेतकऱ्यांशी सुसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:28+5:302021-07-23T04:21:28+5:30
कृषी हवामान केंद्रासह कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा येथील कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार, कृषी अभियंता राहुल चव्हाण, कृषी हवामान ...

जिल्हा कृषी हवामान केंद्राने साधला शेतकऱ्यांशी सुसंवाद
कृषी हवामान केंद्रासह कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा येथील कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार, कृषी अभियंता राहुल चव्हाण, कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव यांनी बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष त्यांच्या शेतातील बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी तालुकानिहाय हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून हवामान साक्षरतेकडे आपले पाऊल पडेल व हवामान बदलाच्या युगात शेती करणे सोपे होईल. पावसाचे पाणी शेतात साचणार नाही, याची काळजी घ्यावी आणि रसशोषक किडींच्या निरीक्षणासाठी व व्यवस्थापनासाठी शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन मनेश यदुलवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी गजानन गायकवाड (सरपंच) यांच्यासह गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.
मेघदूत व दामिनी मोबाइल ॲपविषयी मार्गदर्शन
शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाची कास धरून शेती पिकवावी व पावसाचे पाणी जास्त प्रमाणात कसे साठवता येईल, याबद्दल मार्गदर्शन कृषी अभियंता राहुल चव्हाण यांनी यावेळी केले. अनिल जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मेघदूत व दामिनी मोबाइल ॲपचे शेतीतील महत्त्व यावर संबोधन केले.