जिल्ह्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह, ५५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:56+5:302021-07-01T04:23:56+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात दोन, खामगाव चार, शेगाव चार, देऊळगाव राजा चार, चिखली तीन, मेहकर एक, मलकापूर चार, ...

In the district, 37 corona positive, 55 corona beat | जिल्ह्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह, ५५ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह, ५५ जणांची कोरोनावर मात

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात दोन, खामगाव चार, शेगाव चार, देऊळगाव राजा चार, चिखली तीन, मेहकर एक, मलकापूर चार, नांदुरा एक, लोणार सात, मोताळा एक, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा दोन, संग्रामपूर एकाचा यात समावेश आहे.

दरम्यान ५५ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणीमध्ये ५ लाख ७३ हजार ७८० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८५ हजार ९३४ कोरोना बाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे १ हजार ७२३ संदिग्धांचे नमुने तपासणीसाठी बुधवारी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार ६७५ आहे. यापैकी ७८ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: In the district, 37 corona positive, 55 corona beat