जिल्ह्यात ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह, २० जणांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:25+5:302021-07-12T04:22:25+5:30

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार १६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार १३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...

In the district, 35 corona positive, 20 defeated | जिल्ह्यात ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह, २० जणांची मात

जिल्ह्यात ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह, २० जणांची मात

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार १६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार १३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १७ आणि रॅपीड टेस्टमधील १८ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ८७१, तर रॅपिड टेस्टमधील १ हजार २६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील एक, खामगाव तीन, शेगाव आठ, देऊळगाव राजा दोन, चिखली पाच, मेहकर दोन, नांदुरा दोन, लोणार दहा, सिंदखेड राजा एक आणि संग्रामपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान मोताळा, जळगाव जामोद आणि मलकापूर येथील तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. दुसरीकडे २० जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख १ हजार ८८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८६ हजार ३५९ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

दुसरीकडे १ हजार ४५१ संदिग्धांच्या अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार ११६ झाली असून, यापैकी ९२ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

--पॉझिटिव्हिटी रेट १२.४५ टक्के--

जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट सध्या १२.४५ टक्क्यांवर आला असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट आता १.६१ टक्के झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०.७६ टक्के असून, राज्यात तो सर्वांत कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता जिल्ह्यात ९९.१३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Web Title: In the district, 35 corona positive, 20 defeated